जुलूमशाहीचा होता एक 'काळ' रयतेचा छळ । माजलेला
तोडण्यां ती नाळ अन्यायाची माळ
जन्मा आला बाळ | शंभूराजा
मुघलांची सत्ता माणसांची मंदी वासनेची धुंदी । चढलेली
वाचविल्या माता गुलामासबंदी नारीला जो वंदी । शंभूराजा
संस्कृतचा ग्रंथ बुधभूषणम लागतो जनम । समजाया
तो नाईकाभेद तो नखशिखांत केला पादाक्रांत । ज्ञानमार्ग
कापलेली मांन झुकलीच नाही चालेनाच काही । औरंग्यान्चे
रयतेच्यासाठी रक्तात नाहला अजिंक्य जाहला । शंभुराजा
जळता जळता संपले जीवन आयुष्याचे रान । शंभूराजा
स्वराज्यासाठीच तन-मन-धन
खरे बलिदान । शंभूराजा
मावळ्यांनो आज बाप हा जाणवा आदर्श मानावा । शंभूराजा
काळजात ठेवा धगधगता दिग शिवबांचा छावा । शंभूराजा
डोंगरदरीत कडा कपारीत
आजही इथल्या पवित्र मातीत माणूस जातीत
हर एक जळत्या दिव्याच्या वातीत
मर्दाच्या छातीत । शंभूराजा
कवी - अनंत राऊत
0 टिप्पण्या