आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in चुकली दिशा तरीही | ऑडिओ कविता | विंदा करंदीकर | Audio Poem | vinda karandikar | Fmmarathi

चुकली दिशा तरीही | ऑडिओ कविता | विंदा करंदीकर | Audio Poem | vinda karandikar | Fmmarathi





कवी: विंदा करंदीकर, आवाज: योगेश कर्डिले
...
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks