आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in मी कुणाला कळलो नाही ... सुरेश भट Mi Kunala Kalalo nahi | Marathi Poem in audio mp3 | Suresh Bhatt

मी कुणाला कळलो नाही ... सुरेश भट Mi Kunala Kalalo nahi | Marathi Poem in audio mp3 | Suresh Bhatt

 मी कुणाला कळलो नाही




www.FMmarathi.in

     ------------------------------------

मित्र कोण आणि शत्रू कोण

         गणित साधे कळले नाही..

नाही भेटला कोण असा

        ज्याने मला छळले नाही...

सुगंध सारा वाटीत गेलो

          मी कधीच दरवळलो नाही..

ऋतू नाही असा कोणता

           ज्यात मी होरपळलो नाही..

केला सामना वादळाशी

        त्याच्या पासून पळालो नाही..

सामोरा गेलो संकटाना

           त्यांना पाहून वळलो नाही..

पचऊन टाकले दु:ख सारे

         कधीच मी हळहळलो नाही..

आले जीवनी सुख जरी

           कधीच मी हुरळलो नाही..

कधी ना सोडली कास सत्याची

     खोट्यात कधीच मळलो नाही...

रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण

       मी कुणाला कळलोच नाही...!

       मी कुणाला कळलोच नाही...!


 ‌‌‌ कवी : सुरेश भट

_______________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks