आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in जीवन बॅलन्स ठेवता आलं पाहिजे.... | Sachin Tendulkar and Vinod Kambli

जीवन बॅलन्स ठेवता आलं पाहिजे.... | Sachin Tendulkar and Vinod Kambli

आपल्या जीवनात जास्त बॅंक बॅलन्स केला नसला तरी चालेल पण जीवन बॅलन्स ठेवता आलं पाहिजे...हेच खरं....

दोन दिवस हे फोटो खुप व्हायरल होत आहेत.बरेच जण वेगवेगळ्या (दृष्टी) कोनातून यावर भाष्य करत आहेत.

सचिनचं वागणं खरंचं खूप मनाला भावलं.

आपला विचित्र दिसणारा बालमित्र कोपऱ्यात बसलेला दिसल्यावर तो सगळं कार्यक्रमाचं भान विसरून,कार्यक्रमाचे संकेत विसरून तो पटकन विनोद कडे गेला.

विनोद पण खुप भारावून गेला.एखादी हरवलेली गोष्ट लहान मुलाला गवसली कि तो जसा त्या गोष्टीला सोडत नाही तसा तो सचिनला घट्ट पकडून खुश होऊन आनंदोत्सव साजरा केल्यासारखा उत्साहाने ओरडला.

पण,बघा..

दोघं एकत्र वाढलेली,एकत्र खेळलेली,एकाच गुरूंकडे शिकलेली,शालेय वयात विक्रमी कामगिरी करून जगाचं लक्ष वेधलेली,भारताच्या क्रिकेटच्या पूर्व क्षितिजावर पाठोपाठ अवतरलेले हे दोन सुर्य...

एक तळपत राहिला...

दुसरा मात्र ग्रहणाने ग्रासला.

त्यांचं ग्रहण सुटलंच नाही.

का घडलं हे सगळं?

याचं कारण म्हणजे स्वनियंत्रण,आत्मनियंत्रण,कैफ जीरवण्याची ताकद,सुख-दु:ख दोन्हीला समान ठेवणारा तराजू होण्याची किमया हे सर्व साधायला विनोदला जमलं नाही.

हे योगी असणाऱ्याला जमतं.हे सचिनला जमलं व त्यामुळे सचिन योगी ठरला.

जीवनात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला तो देव झाला....व विनोद???....विनोद भरकटला तो कदाचित भोगी झाला किंवा त्याला त्याच्या मनावर नियंत्रण न ठेवण्यामुळे कदाचित घरगुती,प्रापंचिक, सामाजिक,अर्थिक,व्यावहारिक , वैयक्तिक,व्यावसायिक,मानसिक अडचणी आल्या असाव्यात त्यामुळे किंवा तो स्वतः मजा म्हणून व्यसन व इतर काही गोष्टी असल्यास त्यांच्या आहारी जाऊन वाया गेला असावा व तो या अवस्थेत पोहचला.

म्हणून सुखाने हुरळून न जाता व दु:खाने खचून न जाता येणाऱ्या चांगल्या वाईट परिस्थितीला,अडचणींना सामोरे जात आपण आपलं कर्म करत रहायचं... ते कर्म मोजलं जातं...त्यांचं चीज होतं व जीवन यशस्वी ठरतं

आपलं नाव कुठंतरी कोरलं जातं व सामोरे गेलो नाही,ते सुख दुःख पचवलं नाही तर समुद्राच्या रेतीत लिहिलेलं नाव जसं लाटे बरोबर वाहून जातं तसं आपलं होतं.

म्हणूनचं म्हणतोय जीवनात येऊन जास्त बॅंक बॅलन्स केला नसला तरी चालेल पण जीवन बॅलन्स ठेवता आलं पाहिजे...हेच खरं.!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks