आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in भारताचे रत्न - रतन टाटा सर | a journey of legacy ends

भारताचे रत्न - रतन टाटा सर | a journey of legacy ends

खरे देशसेवक 

सर रतनजी टाटा 

यांना भावपूर्ण श्रद्धांजली

'अजातशत्रू' फार कमी लोकांना लागु होणारी संकल्पना! कदाचित बोटांवर मोजण्याइतकी माणसं! अशा अजातशत्रू माणसांमध्ये 'व्हिजनरी' किती असतील? रतन टाटा माझ्या दृष्टीने असामान्य व्यक्तिमत्व! असामान्य असूनही 'सामान्य' राहणीमानात आयुष्य जगणं आणि त्या सामान्यत्वालाही फार फार विशेष बनवतं! जे आर डीं सारख्या तत्वनिष्ठ उद्योगपतींच्या संस्कारशील मालिकेतील रतन टाटा कदाचित शेवटचं पुष्प असतील! उद्योग उभारणीतही राष्ट्र उभारणीचा विचार करणारी रतन टाटांची शेवटची पिढी असावी! 

स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रगतीचा आलेख दाखवायचा असेल तर रतन टाटांचं आयुष्य दाखवता येईल! रतन टाटांची कारकीर्द आणि त्यांचा जीवनप्रवास काहीतरी सकारात्मक करू बघणाऱ्या प्रत्येकासाठी ऊर्जास्त्रोत आहे! कॉर्पोरेट क्षेत्रालाही सामाजिक बांधिलकी असावी ह्याबाबत त्यांचे विचार आणि कार्य अवर्णनीय होतं! उद्योगशीलता, फिलोनट्रॉफी, प्रयोगशीलता ह्या सगळ्याला राष्ट्रकार्याची जोड हे कॉम्बिनेशनच किती सामर्थ्यशाली ठरू शकत हे रतन टाटांनी जगून दाखवलं! अजून काय लिहिणार? शब्द अपुरे आहेत! रतन टाटांचे अनेक 'कोट्स' मला भावतात, पण सध्या आयुष्याच्या ज्या प्रवासातून चाललोय त्यात टाटांचं खालील 'नेव्हर गिव्ह अप' ऍटिट्यूड नेहमीच प्रेरणा देतं! 

"Ups and downs in life are very important to keep us going because a straight line even in an ECG means we are not alive."

गुडबाय टाटा! यु विल लिव्ह फॉर एव्हर इन एव्हरी इंडियन हार्ट! वुई आर सो थँकफुल टू अलमाईटी दॅट वुई सॉ 'रतन नवल टाटा'ज एरा! 


#रतन_टाटा #ratantata #श्रद्धांजली 🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks