अनेकदा स्वप्न संपली की आयुष्य ध्येयविहीन होतं. कुठेच जायचं नाही अशी समजूत झाली की प्रवास थांबला जातो.आणि मग वर्तमान आणि भविष्याची सरमिसळ होवू लागते.
आपलं जगणं ही फक्त श्वासांची ये जा नसते तर त्यात मनाचा जिवंतपणाही अभिप्रेत असतो. तो जिवंतपणा , जगण्याची उमेद ही स्वप्नच तर देतात. हव्यास नाही पण पुढे जाण्यासाठी स्वतःला "हवं असणं" च्याप्रवाहाशी बांधून ठेवण्यासाठी स्वप्नं,ध्येय महत्त्वाची ठरतात.
कर्तव्य, जबाबदाऱ्या ह्या अनेकदा ओझं म्हणूनच निभावली जातात पण स्वप्न मात्र मनाला त्याची तरलता, संवेदना पुनःश्च प्रदान करतात.
वयाचं बंधन स्वप्नांना नसतं म्हणूनच ती चिरतरुण रहातात. ती पूर्ण होवोत न होवोत आपल्याला "जगलं" पाहीजे समज ते करून देत रहातात.
आयुष्यभर आपण अनेकांच्या ऋणात रहातो ज्याची जाणीव सतत कुठेतरी ह्या ना त्या कारणाने आपण स्वतःला करून देतो पण स्वप्नांचं ऋण कधी लक्षात येत नाही. इतका मोठा प्रवास कसा पार केला ह्या प्रश्नांना " स्वप्नं" हेच असतं.....काही पूर्ण तर काही अपूर्ण.....
0 टिप्पण्या