प्रत्येकाचं आयुष्य एका खेळासारखे असते... खेळणं बनायचं की खेळाडू हे आपण स्वतः ठरवायचं...,!!
पाण्यावर तरंगणारा मृतदेह साक्ष देतो की वजन शरीराचे नसून श्वासाचे असते...!!
दोन प्रकारची माणसे असतात.. टेन्शनमध्ये वावरणारी आणि टेन्शन निर्माण करणारी... तुम्ही कोण आहात.. बघा.!
बुद्धीला पटल्या शिवाय कोणताही विचार करू नका..!!
प्रवासात उतरायचं स्थळ आल्यावर रिकामी झालेली खिडकी जवळची जागा काय कामाची?... आयुष्यात भेटणाऱ्या वस्तू व्यक्ती आणि आनंद ज्या वयात आणि वेळात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या... नाहीतर त्याची किंमत शून्य असते.
आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे.. मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे... पण मृत्यूनंतरही लोकांच्या मनात कायम घर करून राहणं हे केलेल्या चांगल्या कर्माचा भाग आहे...
समुद्रामध्ये कितीही साखर टाकली तरी तो काय गोड नाही होणार.. तसंच मतलबी लोकांना तुम्ही कितीही आपलंसं करून बघा ती कधीच तुमचे नाही होणार..
हवेची पण गंमत असते.... चाकातून गेली की चाक पळत नाही, डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही... पण शरीरातून श्वासोश्वासातून सोडून गेली तर घरात कोणीच ठेवत नाही..
एन्जॉय करण्याची एकही संधी गमावू नका.. एंजिओग्राफी करण्याची पाळी येणार नाही.
Adjustment is not important in life but understanding is most important in a life...
जिथे आपल्या शब्दाला किंमत नसते तिथे शांत राहणे आणि ज्याला आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्यांच्याकडे जाणे टाळणे... यालाच स्वाभिमान म्हणतात.!!
स्त्रियाची जात आणि दिव्यातील वात सारखीच असते... स्त्री स्वतःचा विचार न करता परिवारासाठी राब राब राबते तर दिव्यातील वात स्वतः जळून इतरांना प्रकाश देते...!!
सहन करायची एकदा सवय लागली की दुःख सुद्धा कोणाला सांगायची इच्छा होत नाही...
एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज होऊ नका... कारण भंगाराच्या व्यापाऱ्याला हिऱ्याचे मूल्य कळत नाही
...
0 टिप्पण्या