आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in असे जगावे दुनियामधे आव्हानाचे लावून अत्तर | Marathi Poem in mp3 Audio

असे जगावे दुनियामधे आव्हानाचे लावून अत्तर | Marathi Poem in mp3 Audio

 

असे जगावे दुनियामधे ,आव्हानाचे लावून अत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये ,आयुष्याला द्यावे उत्तर 


नको गुलामी नक्षत्रांची ,भीती आंधळ्या तारांची 

आयुष्याला भिडताना हि, चैन करावी स्वप्नांची


असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये ,आयुष्याला द्यावे उत्तर


पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना

हसू असावे ओठांवरती ,काळीज कडून देताना


संकाटासही ठणकावून सांगावे ,आता ये बहतर

नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर


करून जावे असेही काही ,दुनियेतुनी या जाताना

गहिवर यावा जागास सारा, निरोप शेवटचा देताना 


स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर 

नजरेमध्ये नजर रोखूनी ,आयुष्याला द्यावे उत्तर 

  - वि.दा.करंदीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks