कधीतरी किनाऱ्यावर मित्रांसोबतही बसावं नसतील काही कारणे तरी मनसोक्त हसावं ..!
खळखळत्या लाटांचा प्रवास पहावा, शिंपल्यांसोबत मोत्यांचा सहवास पहावा काठावरील माशांचा त्रास पहावा ...! पहावीत वळणे फुलपाखरांची अन् निश्चल निर्जीव दगडांचा ऱ्हास पाहावा...!
सोडावीत दुखे लाटांवर त्या पण कधीतरी लाटांचा त्या अंत पहावा, एकेकाळी पाण्यासोबत खेळणारा तो पाण्यानेच त्याचा स्वभाव आज शांत पहावा...!
- तुषार ( Shabdkavi )
.
0 टिप्पण्या