आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in यशस्वी आयुष्याचा प्रवास.... | Yashasvi Ayushyacha Pravas

यशस्वी आयुष्याचा प्रवास.... | Yashasvi Ayushyacha Pravas

असा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान होतो.


जो जास्तीत जास्त ऐकण्याची आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करतो. तो नेहमी यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगतो...!


वर्तन दर्पणा समान असते...! ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसतो...!


वाद, भांडण कधीच दोन व्यक्तीमध्ये होत नाहीत, तर ते होत सत्य आणि खोटेपणा या मध्ये होतात. सत्य पचत नसलं की खोटं आवाज वाढवत... संशय, दोष, कमीपणा, चारित्र्यहीनता, परकीय लोकांचा सहारा घेवून सत्य हरवण्यासाठी कट रचते, असे कट काही वेळापुरतेच विजयी होतात. पण जेंव्हा वेळ येते तेंव्हा समजते की सत्याला कुणी हरवू शकत नाही. खोटेपणाचा आनंद तात्पुरता असतो, सत्य मात्र चिरंतर टिकणारे असते...!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks