एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग,
जब चाहें बना ले अपना किसी को,
जब चाहें अपनों को भी बेगाना बना देते हैं लोग,
आपली कोणीतरी हक्काची व्यक्तीसोबत असावी, अशी अनेकांची इच्छा असते. कारण, त्याशिवाय आयुष्याला पूर्णत्व येत नाही, असं म्हणतात. ही व्यक्ती कोण असावी, याचा काही निकष नाही. पण, जो आपलेपणानं जवळ राहतो, आपल्याला समजून घेऊ शकतो, तो 'आपला' असतो.
अगदी हाच विचार करायचा तर आपण जेव्हा आनंदात असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला खूपच गर्दी होत असते. पण, तेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा मात्र आपले डोळे पुसायला जो पुढे येतो, तोच आपला माणूस असतो. आपण गर्दीत असताना मौजमजा करायला खूप लोक सोबत असतात. पण, अगदी एकांत असताना, स्वतःशी संवाद करायचा असताना किंवा एकांतामध्ये आपल्या मनातलं गुपित ज्याला सांगावं असं वाटतं, तोच आपला माणूस असतो.
अनेक प्रकारचं दुःख आपल्याला होत असतं. दुःखाची अनेक कारणंदेखील असतातच. अशावेळी बाहेरुन दिसणाऱ्या जखमांवर मलम लावायला काहीजण भेटतातसुद्धा. पण, मनात खोलवर झालेल्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी आपल्याला आपलंच माणूस हवं असतं. आपण कोणाशीही अबोला धरू शकतो. पण, आपल्यावर हक्कानं रुसणारं किंवा आपला रुसवासुद्धा तितक्याच प्रेमानं काढणारं आपलं माणूस सोबत असेल तर त्यातही गंमत असतेच ना. यश मिळाल्यानंतर आपल्यासोबत नाचायला अनेकजण येऊ शकतात. पण, जेव्हा आपण अपयशी ठरलेलो असतो किंवा जेव्हा आपण निराश झालेलो असतो, तेंव्हा आपल्याला त्यामधून सावरण्यासाठी कोणीतरी हक्काचा आणि आपलाच माणूस लागतो. बरोबर ना..!
"बरेचवेळा आपण अशा व्यक्तींना गृहीत धरलेलं असतं..
माझं दुःख हें इतरांच्या हसण्याचं कारण होऊ शकतं, पण माझं हसणं हें कोणाच्याही दुःखाच कारण होऊ शकणार नाही ह्या तत्वप्रमाणे आयुष्यभर आतल्या आंत दिव्याच्या ज्योतीप्रमाणे जळत राहून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचं कामं अशा व्यक्ती करतं असतात.
अशा व्यक्ती सहसा कोणासमोर व्यक्त होतं नाहीत...
"तरीही आपल्या हक्काची माणसं असतात"
"कधीतरी वेळात वेळ काढून आपल्या हक्काच्या माणसांना विचारा कसे आहात..!, नाहीतर आयुष्यभर खंत राहिलं".
" विचारायचं राहून गेलं"
@मिलिंद आमले
0 टिप्पण्या