रोजच्या जीवनात भीतीला जा सामोरे दिलदार मनाने…..
"डर के आगे जीत हैं"
प्रत्येक माणसाला रोजचं कशाची ना कशाची भीती वाटते.
कधी काम नीट होईल की नाही ही भीती,
कधी केलेल्या कामाचं चीज होईल की नाही ही भीती,
कधी माझं भविष्य कसं असेल ही भीती....
कुणाला शिक्षणाची भीती, कुणाला माझं प्रेम मला मिळेल का ही भीती…
साऱ्यांना सारखीच भीतीचं भीती....
कुणाला लग्न न जमण्याची भीती, लग्न जमलेल्यांना/झालेल्यांना आयुष्य सुरळीत पार पडेल का असली भीती,
कुणाला मुलं होण्याची भीती, कुणाला झालेली मुलं कशी निघतील याची भीती,
कधी नवीन घर,बंगला मिळेल का नाही याची भीती तर,
कुणाला माझ्या प्रिय व्यक्तीला काही बरवाईट झालं तर,असली विचित्र भीती.
एका सायंटीस्टने केलेला प्रयोग आठवतो....
मुक्तपणे बागडणार्या दोन उंदरांना त्याने पकडुन आणलं आणि वेगवेगळ्या पिंजर्यात ठेवलं.पहील्याला तो रोज कमी तीव्रतेचा इलेक्ट्रीकल शॉक द्यायचा,थोड्याच दिवसात ह्या टॉर्चरने पहीला उंदीर मेला.त्याचं डिसेक्शन करण्यात आलं,तेव्हा त्याच्या शरीरात एक विष तयार झालेलं आढळलं.
दुसऱ्या उंदीराला बारीक जाळीच्या पिंजर्यांत ठेवुन,त्याला एका मांजरापाशी ठेवलं गेलं, मांजर त्याचा फडशा पाडण्यासाठी सारखं त्याला रोखुन बघायचं,पण जाळीमुळे तो खाऊ शकायचा नाही,दोघांनाही हे माहीत होतं.पण मांजराला नुसतं बघुनच उंदीर गलितगात्र व्हायचा,
लवकरच भीतीने झुरुन झुरुन तोही मेला,
त्याचही डिसेक्शन झालं…. आश्चर्य म्हणजे त्याच्याही शरीरात विषाचे अंश होते, इलेक्ट्रीक शॉकने मेलेल्या पहील्या उंदरापेक्षा उलट जास्तचं विष त्याच्या शरीरात आपोआप तयार झालं होतं,म्हणुनच शब्द-प्रयोग पडला असेल ना, विषारी भीती.
मला सांगा...
चिंता करुन,काळजी करुन, भीतीने आतल्या आत झुरुन काय साध्य होतं?कितीही मोठं संकट असु द्या,त्याला चिल्लर समजा,“कोणत्याही प्रॉब्लेमपेक्षा मी मोठ्ठा” या ऍटिट्यूडने जगा…..
नक्कीच भीती पळुन जाईल.
तुम्ही स्वतःला लहान,असहाय,हतबल समजाल तर भीतीचा बागुलबुवा तुमच्यावर चाल करुन आलाच म्हणून समजा.त्या राक्षसाला भिडायचं नाही आणि त्याला शरणही जायचं नाही,त्याला निर्भयतेच्या बाटलीत बंद करुन ठेवायचं बरं...
परिस्थितीमुळे,जुन्या अनुभवांमुळे मन जर भित्रं अणि कमकुवत झालं असेल तर त्या परमपित्या भगवंताला शरण जा...
गीतेमध्ये भगवंत सांगतात,मी तुझ्या हृदयात वसलेलो आहे,तु माझाच अंश आहेस.
मुक्या जनावरांना शेती करता येत नाही,पण तो त्यांची खाण्याची व्यवस्था करतोच ना..!
पक्ष्यांना तो झोपेत खाली पडु देत नाही.
जगात कुठल्या सजीवाला उपाशी मरु देत नाही.
खगोलशास्त्रांना विचारा, पृथ्वी सुर्यापासुन एक अंश ही दुर किंवा जवळ असती, तर नष्ट झाली असती.
मग सगळ्या जगाला सांभाळणारा तो,
आपल्याला सांभाळणार नाही का?
देवावर अतुट विश्वास हाच भिती घालवण्याचा एकमेव उपाय आहे.
देव माझ्या पाठीशी आहे, काहीही वाईट झालं तरी त्याच्याकडे माझ्यासाठी अजुन काहीतरी चांगलं नियोजन तयार आहे.
व.पु. काळे एके ठिकाणी म्हणतात,“वार झेलायला उभं राहीलं,की मारणार्याचं आपोआपचं बळ जातं.”
आणि महान संत गब्बरबाबा शोले प्रवचनात सांगुन गेलेत,“जो डर गया,वो मर गया”
सुसान जेफर्स ह्या लेखिकेचं एक अफलातुन पुस्तक आहे,“फील द फिअर एंड डु इट एनी वे”
भीतीला अनुभवा,सोबत आपलं घोडं पुढं दामटत रहा, विजय तुमचाच आहे.
जे लोक आपल्या आयुष्यातुन भीतीची विषारी मुळे उखडुन फेकण्यात यशस्वी ठरले,तेच असामान्य झाले.
ह्यासाठी काही उपाय---
भितीचा मजाक उडवा कुटुंबातील किंवा मित्रातील व्यक्ती निगेटीव्ह बोलु लागल्या की त्यांना टाळा,चुप बसा, किंवा तिथुन निघुन जा.
अजुन वाईट झालं असतं,पण देवाने आपल्यावर कृपा केली हे विसरु नका.
समस्येला वाढवुन चढवुन बघु नका,आजुबाजुला तुमच्यापेक्षाही बेकार परीस्थीतीत माणसं आनंदाने जगत आहेत.
ध्येय पुर्ण झालयं असं मनाला पटवुन द्या,आनंदाचा झरा तुडूंब वाहु लागेल.
आतापर्यंत आपण पाहिलं कि भीतीचा बागुलबुवा कसा आपल्याला घेरतो आणि त्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल.
नाण्याच्या नेहेमी दोन बाजु असतात,तसेच प्रत्येक गोष्टीचे दोन प्रकार असतात,चांगली आणि वाईट…
भीतीचे जसे काही तोटे आहेत, तसे भीतीचे काही फायदेही आहेत.मी जर असं म्हंटल की भीती सुद्धा प्रेरणादायी असते,तर तुम्हाला धक्काच बसेल.
पण बघा ना…..!
नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थी अभ्यास करतो.
गरीब होण्याच्या भीतीने माणुस, आळशीपणा झटकुन कामाला जातो.
भीती वाटतेय,याचा अर्थ तुम्ही समस्यांकडे लक्ष देताय.
भीती एक हातात छडी घेतलेल्या शिक्षकाचं काम करतेय.
भीती आपल्याला खुप कष्ट करण्यासाठी मिळणारं इंधन असतं..
एकटेपणाच्या भीतीने माणसं लग्न करतात,आणि सेटल होतात,…
गरीबीच्या भीतीमुळे,माणसांची करीअर घडतात.
नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी ओव्हरटाईम करतात.
हारण्याच्या भीतीने खेळाडु, दिवसरात्र प्रॅक्टीस करतात.
बदनामीची भीती असणारी माणसं,सज्जनपणे वागतात.
ज्यांना मरणाची भीती असते ते, आयुष्य सत्कारणी लावतात.
भीतीचा वापर दुबळं होण्यासाठी करायचा का जागं होण्यासाठी?…
ते आपल्या हातात असतं..
म्हणुन म्हणतो, कधीकधी आयुष्यात भिणं पण चांगलं असतं…तुम्ही कितीही संकटात असा….दुःखात असा…. आयुष्यातल्या विविध समस्यांनी त्रस्त असा
पण एखाद्या,आपल्या माणसाला,दुःखात पाहुन इतकं नक्कीच म्हणा,किसका हैं डर तुझें, मैं हुं ना,यार...
“मी आहे ना,यार!…”
हे तीन शब्दचं जगण्याचं नव बळ देतील.
त्याला आणि तुम्हालाही...
0 टिप्पण्या