Shital Babasaheb Shinde |
माणुसकी
पंख त्याचेच मजबूत असतात
जे आयुष्यात एकटे उडतात
स्वप्नांना संधी मिळते करण्याची
वेळ येते आयुष्याच्या कर्माची
आयुष्य म्हणजे अंधार पडायल
जगता आल तर सांगता येईल
प्रयत्न केले तर मार्ग सापडत जाईल
काय फायदा या आयुष्याचा
तुम्हाला नसेल अनुभव माणुसकीचा
किमंत नसेल दुसऱ्याच्या आयुष्याची
का अशी शिक्षा भेटली तिला नियतीची
मन भरता डोळे भरून येतात
अश्रूना लपून पापण्या मिटून जातात
आठवता तर छाती भरून येतो
वेळ पडली तर हुंदका दाटतो
स्वप्न बघन सोडली की क्षमता संपली
आशा ठेवण सोडलं की विश्वास संपला
जिवनात माणसे एकदाच येतात
आयुष्य पुर्ण बदलून जातात
जिवनात चार माणसं चांगले मिळवा
त्यांच्या बरोबर आयुष्य चांगल बनवा
संधी मिळते माणुसकी जपण्याची
का कुणास ठाउक वापर होते स्वार्थसाठी
संघर्ष जिवनाचा
तुझ्या दुःखात आहे तुझ सुख,
उदयाच्या चिंतेत आज नको विसरू
कधी दुःखाला कर जवळ तर,
कधी सुख येईल तुझ्या जवळ
लोकांच्या खोट्या चिरान
नाही होतील तुझे स्वप्न पुर्ण.
तुझी जिद्द तुझी मेहनत
तुझ्या यशाच कारण बनव.
खुप संघर्ष कराव लागेल
तुला घरातुन बाहेर पडाव लागेल
यशाच मशाल हातात घेऊन
तुझ्या ध्येयाला लक्ष बनवुन
डोळ्यातून बाहेर पडाव
इतक दुःख ही मोठ नाही
पाचणीच्या आडोश्याला लपाव
एवढ सुख ही छोट नाही.
जिवनात न मागता मिळल
तर त्याची किंमत नाही राहील
जिवनात तुला संधर्ष नसेल
तर तुझ्या जिंकल्याच सुख कसल....
नशीब
स्वतःशी केलेली हट्ट
ही अवाक्य गोष्ट शक्य होती
काही आपल्याला एव असत
ते आपल्या नशीबात नसत
जीवन नकोय वाटते
तेव्हा काळ नाही संपत
जीवनातील अर्थ समजते
तेव्हा आपला काळ संपते...
चालताना पाय अचानक थांबतात
बोलताना शब्द शांत होतात
नशीबा समोर काही नाही चालत
जिथे तो नेईल तिथे जाव लागत...
जीवनात सर्व काही हवस वाटतं
तेव्हा कोणी सोबत नसतं
जेव्हा कोणी नको वाटतात्
जीवनाचा सहवास नाही संपत..
असे का जगायचे
असे का जगायचे एकदिवस जायचे
सुख्ख दुःखाचे भोग उगेच का भोगायचे " ||धृ ||
कळले जीवन आहे अर्थ
नाही कळले जीवन आहे व्यर्थ
व्यर्थ का जीवन उगे वहायचं ||1 ||
वाईट करण्या पूढे सरू नको
पुण्य करण्या मागे फिरू नको
सदाच असे रे वागायचे... || 2 ||
काम आपले कर्तव्य मान
कामामध्ये देवास जान
जीवनास यातुनच महान करायचे ||3 ||
असे का जगायचे एकदिवस जायचे
सुख दुःखाचे भोग उगेच का भोगायचे ||4 ||
2 टिप्पण्या
Nice 👍
उत्तर द्याहटवाKya baat hai
उत्तर द्याहटवा