कृष्ण हा खरतर प्रत्येक क्षणी आपल्या बरोबरच असतो ...
कदाचित त्याची रूप वेगळी असतील,
पण तो असतो प्रत्येका बरोबर पण प्रत्येकाला त्याला ओळखता हि यायला हवं...
आणि ओळ्खण्या साठी कृष्ण म्हणजे नेमकी काय हे समजायला हि हवंच...
पण ह्या कलीयुगात सर्वच जण " मी " पणाच्या शकुनी मना पुढे इतके वाहून जातात की कृष्ण बाजूला जरी असेल तर कळणार कसा ?
कृष्ण समजायला सुदाम्या सारखी निस्वार्थ मैत्री, अर्जुना सारखं हळवं मन, उद्धवा सारखी आसिमत श्रद्धा, मिरेसारखा सच्चा सेवा भाव, राधे सारख शुद्ध प्रेम भाव, मीरा सारखा समर्पण भक्ती भाव अशा अनेक पैकी एखादा तरी गुण किंवा वृत्ती आपल्या ठायी असली की कृष्ण आपल्याला थोडासा का होईना पण नक्कीच समजेल.
मग तो ओळखायला हि नक्कीच सोप्पा...
कृष्ण म्हणजे सर्व काही असून ही वैराग्य ...
कृष्ण म्हणजे सामर्थ्य असून ही बाळगलेला संयम ... कृष्ण म्हणजे सर्वज्ञ ( ज्ञान ) असून ही ठायी असलेला विनयभाव ...
कृष्ण म्हणजे समस्ये प्रमाणे धारण केलेला आकार ( न्याय ) ...
कृष्ण म्हणजेच अर्थ, कर्म, धर्म व काम यांचा समतोल साधणारा स्थितप्रज्ञ योगी ...
कृष्ण म्हणजेच साम दाम दंड भेद या नुसार आयुष्यात मार्ग दाखविणारा गुरु ...
चौसष्ट विद्या व सोळा गुणांचा स्वामी म्हणजे कृष्ण ...
तो जेवढा सहज तेवढाच अवघड ...
थोडा " मी " पणा बाजूला ठेवून, निस्वार्थ, निष्काम व आसक्त रहित मनाने त्याला साद द्या ...
तो नक्कीच येईल व आपल्या या जीवन रुपी प्रवासात आपल्या रथाचे सारथ्य हि करेल ...
फक्त " मी " पणाची वृत्ती सोडून समर्पित मनाने, निस्वार्थ वृत्तीने, श्री कृष्णमय होऊन पूर्ण श्रद्धेने शरण जाता आलं पाहिजे ...
मग जो समजेल, उमजेल , कळेल, मिळेल तो सर्व एकच म्हणजे कृष्ण .
जय श्री कृष्ण
0 टिप्पण्या