संजय धनगव्हाळ
**************
आपल्या आयुष्यात आपल्या अवतीभवती खूप वेदना,यातना, समस्या,अडचणी असतात खूप चिंता असते खूप नैराश्य असते
कशातच मनं लागतं नाही एकाकीपणा वाटतो उत्साह रहात नाही गालावर हसु येत नाही जणूकाही चैतन्यचं निघुन गेल्यासारखे वाटते आयुष्य निरस होते अशा वेळेस कोणाची तरी सोबत हवीशी वाटते. समजून घेणारा,आनंद देणारा वेदना यातना नैराश्यातून चिंतामुक्त करून याही पलीकडे सुरेख सुंदर गोड गुलाबी आयुष्य आहे हे समजावून सागणारा अलगत हातात हात घेऊन मी आहे ना बस अशी अंतकर्णातून हाक देणारा एक तरी मित्र हवाच असतो.अस असलना तर कितीही अडचणी आल्यात तरी आयुष्याच्या वाटा आपोआप मोकळ्या होतात मन प्रसन्न होते. खर तरं काही मित्र मैत्रीण तात्पुरते असतात ते फक्त सहानुभूतीच हात पाठीवर ठेऊन अर्ध्यावर सोडून जातात.पण आपली अश्रुतर आपल्यालाच पुसायचे असतातना.पाणावलेले डोळे पाहून एक छोटस स्मितहास्य करून निघून जातील पण काळजी करू नकोस मी आहे अस कधीच म्हणणार नाही.या उलट एखादी श्रीमंत असला की त्याचा उगाचच उदोउदो करतील पण त्यांच्या गर्दीत आपला नंबर शेवटी असतो किंबहुना आपण कशातच नसतो म्हटले तर दुर्लक्षित असतो. अशावेळी मै हुं ना अशी हाक देणारा एक हात हवा असतो.काही नाती ही विधिलिखित असतात ती नकळतपणे जुळतात काही नाती ठरवून जुळतात.आणि जी जुळतात त्यांना नजरेची भाषा कळते म्हणूनच या नजरानजरीच्या खेळातून एकमेकांच बघणं होतं. पण त्या पहिल्यांदा बघण्यातून पहिल्या भेटीतचं दोघांची मनं मैत्रीच्या जाळ्यात विणली गेली असतात आणि पुन्हा जेव्हा कधीतरी कुठेतरी केव्हातरी भेट होते तेव्हा एकमेकांना पाहिल्यावर
आपलेपणाची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही.अशा कितीदा एकमेकांना बघण्यातुन, अनेक भेटीतून मनाला स्फूर्ती मिळते,आपला कोणीतरी जिवाभावाचा आल्याचा आनंद स्वतःलाच नाही तर पावलांनाही होतो म्हणूनतर त्याला किंवा तिला पाहिल्यावर पावले आपोआप त्याच्या दिशेने वळतात.कस असतना की एका अनोळखी व्यक्तीशी मैत्री नुसती बघण्या बघण्यातूनच आपलीसी केव्हा होते काही कळतच नाही.त्या आपल्यापणातच मैत्रीचा गोडवा असतो,मनाला भुरळ आणि गारवा देणारी भावनीकता त्या मैत्रीत असते आणि अशी मैत्री मनात कायम घर करून रहाते. यदाकदाचित भेट होत नसली तरी नुसता विचार जरी केला तरी आपल्याला हवी असणारी व्यक्त आपल्या जवळ असल्याचा भास होतो.तो भास म्हणजेच मनातून जवळकी सादलेली मैत्री असते. अशाच व्यक्तीजवळ आपल्या व्यथा वेदना मोकळ्या करायच्या असतात आणि मन मोकळ झाल्यावर निश्चित जगण्याला नवी दिशा मिळते.आपल्या चिंतेचा भार त्याच्या खांद्यवर ठेवता येईल किंवा आपल दुःख पेलण्याच बळ त्याच्या किंवा तिच्या खांद्यात असलं तरी मन हलकं होतं.डोळ्यातून निघालेला अश्रुंचा एक थेब ओंजळीत जपून ठेवणारा एक मित्र असला की कुठल्याच अडचणी समोर येत नाही.तो किंवा ती असल्याच्या जाणीवेने अंगात नवचैतन्य संचारल्या शिवाय रहात नाही.म्हणून एकतरी मित्र किंवा मैत्रीण हवीच.
मैत्री हे जीवनातील एक सुंदर नाते आहे, ज्याशिवाय जीवन हे व्यर्थ आहे.प्रत्येकाचा असा एकतरी मित्र असतो जो आपल्याला आपल्या जीवापेक्षा प्रिय असतो.मैत्री ती नाही जी जीव देते,मैत्री ती ही नाही जी हास्य देते,खरी मैत्री तर ती असते जी पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते.खरी मैत्री तिच असते ज्या मैत्रीत गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो,हेवादावा नसतो खऱ्याखुऱ्या मैत्रीत एकमेकांमधे अंतर कधीच येत नाही. एकांतातही त्याची आठवण यायला हवी, आणि अशा खळखत्या पाण्यासारखी निखळ मैत्रीतच प्रेम असते. अडीअडचणीच्या काळात किंवा कोणत्याही सुख दुःखात
जेव्हा आपला मित्र आपल्यासोबत उभा असतो तेव्हा त्यातून हेच दिसून येतं की त्याची मैत्री नावापुरती नसून त्याला आपली ख-या अर्थाने काळजी आहे. एकमेकांप्रती ही काळजी जेव्हा दिसून येते तेव्हा त्या नात्याची दोर अधिक घट्ट झालेली असते.सुख-दु:खात साथ देणारी मैत्रीच आयुष्याच्या शेवटपर्यंत आपले स्थान कायम ठेवते.दोघांमधले मैत्रीचे नाते घट्ट असले की मग सावली सुध्दा साथ सोडत नाही.मैत्री ही एक सुंदर भावना असते ती शब्दांपेक्षा सत्यात जास्त बोलते.म्हणूनच मैत्रीचे बीजांकूर वाढण्यासाठी दररोज त्याला प्रेमाचं खतपाणी द्यावंच लागतं.ह्रुदयाशी ह्रुदय हितगुज करू लागले की निखळ मैत्रीचं एक निर्मळ नातं तयार होते आशा मैत्रीतचं जिव्हाळा असतो म्हणून जिथे भेट होईल तिथे गळाभेट होतेच.किंबहूना दिसताक्षणी एकमेकांना भेटण्याची ओढ निर्माण होते.मैत्रीच नातं हे ह्रुदयातून होते आणि ह्रुदयातून जुळलेली मैत्री म्हणजे भगवंताने दिलेली अनमोल भेटच समजावी म्हणून तर जिवलग मित्र मैत्रिणी ठरवण्याचा अधिकार देवाने आपल्या दिला असतो.कारण जे डोळ्यांना आवडत ते मनापर्यंत पोहचतं,जे मनापर्यंत पोहचतं ते ह्रुदय स्विकारतं आणि जे ह्रुदय स्विकारतं त्याच मैत्रीचा निखळ निर्मळ भावनांचा सरोवर आपुलकीचा गारवा देत असतो.म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे आणि सुरेख सुदंर आयुष्य मनमोकळेपणाने जगायचं,जगण्याचा आनंद घ्यायचा या आनंदातून असं एक मैत्री नातं तयार करायची की त्याला किंवा तिला आपण नसल्याच्या जाणीवीने अस्वस्था झाली पाहिजे.कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीच नातं अधीक जवळचं होऊन जाते कारण नात्यागोत्यातील माणसं दुर होतील पण मित्राने मित्राचा धरलेला हात कधीच सुटणार नाही.अंतर देणार नाही तो सदैव पाठराखण करून आधार देत असतो.म्हणूनच एक जिवाभावाचा मित्र अथवा मैत्रीण असणे गरजेचे आहे की त्याच्या जवळ हक्काने आपण मन मोकळं करू शकतो,हितगुज करू शकतो.आपला जवळचा मित्र आपल्या सुख दुःखाचा,यश अपयशाचा साक्षीदार आणि उत्तम मार्गदर्शक असतो.मैत्रीत प्रेम असते.मैत्रीत प्रतीक्षा असते,मैत्रीत समजुतदारपणा असतो.
मित्र एक असा व्यक्ती असतो की जो आपल्या भुतकाळाला समजून घेतो.आपल्या भविष्याचा विचार करतो आणि आपण जसे आहोत तसेच स्विकारतो.म्हणून माझ्या कॉलेजच्या मित्रांनी मला आजही अंतर दिले नाही.खर तरं माझ्याशिवाय माझे सर्व मित्र करोडपती आहेत पण त्यांचे माझे नाते आजही घट्टचं आहे त्यानी मला काळजाशी घट्ट धरून ठेवले आहे. असेच काही माझ्या साहित्यिक गोतावळ्यातही खूप जिवाभावाचे,जिव्हाळ्याचे असे खूपच मित्र झालेत की त्यांनी मला आपल्या हुदयात जागा दिली नव्हेतर काळजाला काळजाशी गाठ बांधून घेतली.माझ्या कवितेने त्या शब्दप्रभूंनी मला त्यांच्या आयुष्यात आगळेवेगळे स्थान दिले.
मैत्रच नाते हे विचारापलीकडचे नाते आहे.म्हणून मैत्री म्हणजे प्रेम,मैत्री म्हणजे आपुलकी मैत्री म्हणजे श्वास आणि मैत्री म्हणजे आठवण.जो आपल्या मनाची काळजी त्याच्या मनापेक्षा जास्त घेतो. कारण खरा मित्र साथ सोडत नाही.एकाकी होऊ देत नाही. सुखदुःखात साथ देवून संकटकाळी हात देणारा मित्र देवासमानच असतो म्हणून देव ज्यांना रक्ताच्या नात्याला जोडायच विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.आणि मैत्रीत वयाच काहीच बंधन नसतं जेथे विचार जुळले तेथे खरी व पक्की मैत्री होते.जेव्हा कोणी हात आणि साथ सोडून देतो तेव्हा मदतीला फक्त मित्रच धाऊन येतो.
म्हणून म्हणतो प्रेम असो वा मैत्री जर ह्रदयापासून केली तर ती तुटता तुटत नाही सुटता सुटतं नाही. अशा मैत्रीशिवाय आपण एक क्षणही राहू शकतं नाही.तेव्हाच तर माझ्याही आयुष्य असे काही खास मित्र आहेत की ते कायम माझ्या काळजात आहेत. सहजासहजी भेट होत नाही पण जेव्हा भेटतो तेव्हा सोडत नाही. नुसते एकमेकांच्या नजरेला नजर देऊनच साऱ्या सुखदुःखाचा व्यथा वेदनेचा लेखाजोखा कळतो आणि स्मित हास्य देत मी आहे ना बस मग काळजी कशाला अस एकमेकांना पाहून एकमेकांना सांगुन आधार देतो.एकमेकांना सांभाळून घेतो.म्हणून शेवटी एकच सागावस वाटतं की जीवनात बरेच मित्र आलेत काही ह्रुदयात स्थिरावलेत काही डोळ्यात तर काही मनात घर करून राहिलेत काही नकळतपणे निघून गेलेत जे ह्रुदयातून नाही गेल्यात ते तुमच्यासारखे जीवलग मित्र कायम माझ्या जवळच राहीलेत तेव्हा एकच लक्षात ठेवायच मनातलं ओझं कमी करण्याचं हक्काच ठिकाण म्हणजे मित्र.मग तो मित्र श्रीमंत असो अथवा गरीब अतंर दिल नाही म्हणजे मैत्री जिगरीच असते बसं....
संजय धनगव्हाळ
९४२२८९२६१८
0 टिप्पण्या