आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in यश आणि अपयश... Success and Failure free Audiostory in marathi

यश आणि अपयश... Success and Failure free Audiostory in marathi



 यश आणि अपयश.....


जीवनात येणारे यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात मोठे व्हायला ओळख न्हवे माणसांची मन जिंकावी लागतात कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी काम करतात ती माणसं बुद्धिमान असतात एकटं वाटणारी माणसे कायम दुःखी असतात असं नसतंच एखाद्याकडे आनंद वाटायलाही कुणी नसणं ह्याला एकटेपण म्हणतात जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो जो दुसऱ्यांना प्रेम देतो मुळात तोच स्वतः प्रेमळ असतो कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते सुख दुःखात जास्त अंतर नसतं जे मनाला भावतं त्याला सुख म्हटलं जातं आणि जे मन स्विकारत नाही त्याला दुःख म्हटलं जातं काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या नियतीच्या हातात असतात सुखी व समाधानी राहण्यासाठी प्रत्येकाने सुख दुःख स्विकारले पाहिजे पंगत चुकली तर एक वेळचे जेवण चुकते पण संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते यासाठी योग्य माणसं बरोबर असणं गरजेचं असते दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक दिपमाळ तयार होते फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडल गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं शहणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो यशाच्या प्रवासात स्वप्नांना वाट मोकळी करून दिली की इच्छा अपेक्षांची बंधने उरत नाहीत सुखी आयुष्याची दोन तत्व सांभाळली पाहिजेत त्यापैकी एक म्हणजे वापर हा वस्तूचा करावा माणसांचा नको तर दुसरं तत्व म्हणजे प्रेम हे माणसावर करावं वस्तूवर नको पोट कसही भरता येऊ शकत पण काळीज भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सवयी बनतात सवयींवर लक्ष ठेवा त्यातुन चारीत्र्य घडते चारीत्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते आयुष्यात कांही मिळो अथवा ना मिळो पण अनुभव मात्र खुप मिळाले जिथे आपण ठेच लागुण पडतो ना तिथुनच तर सुरुवात होते सांभाळून चालायची मग ती ठेच पायाला असो किंवा मनाला परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली ही असतात कडकडुन भुक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभिमान हीच आपली खरी श्रीमंती. समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःच महत्त्व कमी करून घ्यायचं नाही ज्याच्या जवळ स्वतःची बुध्दी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं तो कधीच दुसऱ्याच्या हातचे बाहुले बनत नाही किंमत आणि वेळ यांची गंमतच असते ज्यांच्या बद्दल मनात किंमत असते ते आपल्यासाठी वेळ देतीलच असे नसते तर ज्यांना आपण वेळ देतो ते आपली किंमत ठेवतीलच याची खात्री नसते मनस्थिती खंबीर आसली की माणुस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही आपण सत्याबरोबर चालायचे बस एक दिवस काळ आपल्या बरोबर चालेल फक्त परिश्रम घेताना नम्रता सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदाने कर्म करीत रहायचे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे तुकाराम महाराज म्हणतात साधकानें चाले तैसा बोले इथपासून सुरुवात करावी जेवढे आपल्या आचरणात आले तेवढेच बोलायचे याकडे लक्ष दिल्यास दिवसभरातील​ बरेच बोलणे कमी होऊन आपोआप मौन साधेल मौन साधले म्हणजे अंतर्मुख दृष्टी होऊन नाम जास्त होईल असा अभ्यास बराच वाढला की बोले तैसा चाले हे अनुभवाला येईल मनुष्याच्या शरीरातील कान हा सर्वात घातक अवयव आहे तो जे ऐकतो ते डोळ्याला सुद्धा खोटे ठरवायला भाग पाडतो संतांचे ज्ञान स्वतंत्र व भगवंतापासून आलेले असते संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आसतात हौसेने किंवा विद्वता दाखविण्यासाठी संत ग्रंथ लिहीत नाहीत तर जडजीवांचे कल्याण ही भावना त्यामागे असते ग्रंथातून संत परमार्थाची शिकवत देतात संतांचे ग्रंथ वाचून आनंद कायम मिळेल यात शंका नाही. संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळेल.


सदाचरणाने राहणार्‍या माणसाला खर्च कमी लागतो कारण खर्‍या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते मी हे वारंवार सांगतो कारण सदाचारणाचे नीतिधर्माचे आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पाया आहे पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही त्याप्रमाणे नीति जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही परस्त्री मातेसमान माना परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा या तीन गोष्टींना फार सांभाळा परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे. नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही राम कर्ता ही भावना ठेवून नामात राहणे म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणेच होय व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्यभावाने शरण जा देवाला शरण जाताना सर्व विसरून जा समजा एखादा माणूस नाटकात राजाचे काम करीत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखे वागू लागला तर त्याचा व्यवहार बिघडून जाईल त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त विद्वान पैसावाला ही सर्व नाती विसरून गेले पाहिजे कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच  यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा कर्म करणे यात विशेष नाही आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही कर्म करा असे गीतेतही सांगितले आहेच परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय काय होते ते पहा हेच निष्काम कर्म भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे सर्व गीतेचे सार आहे जो समजून त्याग करील त्याला फायदा होईल नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्याजवळ सुद्धा आहेत भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ति धारण करतो आणि आपण अपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो  हे काय कामाचे त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येते ते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय या यज्ञामध्ये वासनांची आहुति द्यावी कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे जेथे वासना संपली  तेथेच भगवंताचे कृपा झाली सुखी आयुष्याची दोन तत्व सांभाळली पाहिजेत एक म्हणजे वापर हा वस्तूचा करावा माणसांचा नको तर दुसर तत्व म्हणजे प्रेम हे माणसावर करावं वस्तूवर नको आयुष्य छान आहे थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे सुखासाठी कधी हसावं लागंत तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते तेव्हा तुमची चुक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो वाईट कोणीच नसतं हो पण जीवनात अशी वेळ सुध्दा येते की माणुस कितीही चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी नजरेत वाईट होतोच कधी कुणाला शोधात नका निघू कारण लोक हरवत नाहीत बदलून जातात ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टीवरूनही पाणी येतं ते लोक कमजोर नसतात तर सच्च्या मनाची असतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks