आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in जगायचं कस ? रिग्रेट लाईफ की ग्रेट लाईफ ? Free Audiobook on life in marathi mp3 | Marathi Audiostories

जगायचं कस ? रिग्रेट लाईफ की ग्रेट लाईफ ? Free Audiobook on life in marathi mp3 | Marathi Audiostories






 जगायचं कस?

रिग्रेट लाईफ की ग्रेट लाईफ ?

धनंजय देशपांडे 


एक इंग्लिश पुस्तक वाचनात  आलं ब्राउनी वेयर चे 

"द टॉप फाईव्ह रिग्रेट्स ऑफ लाईफ"

तर यात काय आहे ? 

की अमुक एक आपल्याला करायच होत पण करता आलं नाही, हि जी खंत असते अशा पाच मुख्य खंत कोणत्या त्यावर या पुस्तकात विवेचन केलं आहे.


उदा. मला चित्रकार व्हायच होत पण झालो नाही. मला मनासारखं लग्न करता आलं नाही (म्हणजे मनात जो जोडीदार होता त्याच्याशी) अशीच पाच खंत त्यात आहेत अन त्यामुळे आपण अनेकदा उदास होतो,असं त्यात म्हटलं आहे. 


पण खरं सांगू ?


पुस्तक म्हणून किंवा एक थॉट म्हणून ते पुस्तक ठीक आहे मात्र मला *कोणत्याच गोष्टीचे रिग्रेट (खंत) कधीच नसते*

कारण ?


मनात जेव्हा जे येईल ते मी करून मोकळा होतो ! लोक काय म्हणतील याला मी फाट्यावर मारतो !


त्यामुळेच कदाचित मी मस्त जगत असेल,आता पन्नाशी उलटून गेली. तरी मी पंचविशीचा जगतो. कुणीतरी विचारलेल्या 

*"या वयात हे शोभत का?"*

या टिपिकल प्रश्नाला मी उलट टपली मारून पुढे जातो. 

कोणत्या वयात काय करावं? हे कुठल्या शास्त्रात सांगितलं आहे?

पन्नाशी ओलांडली म्हणून मी रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी हाणायची नाही का ?

जत्रेतल्या पाळण्यात बसायच नाही का ?

गावी गेल्यावर विटी दांडू खेळायचं नाही का ?

*अरे हूड !*

मी हे सगळं आजही करतो. गडकिल्यावर गेलो तर मस्त तिथं गवतात पडून राहतो.जमिनीवर लोळत पडतो.कपडे खराब होतील हा विचारच मी केला नाही कधीच ! मळले तर मळू दे की ! वॉशिंग पावडर कशाला आहे मग ? 

कपडे खराब होतील म्हणून लोळण्याचा आनंद का घालवू मी ?

*अरे हूड !*

हे सगळं मनासारख जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे.अट एकच की,तुमच्यावर असलेली जबाबदारी तुम्ही नीटपणे पार पाडत असणं गरजेचं. 

उदा. मी जर हेड ऑफ द फॅमिली आहे, तर घरातील सर्वांचे पालन पोषण करण्यासाठी योग्य  उत्पन्न मी कमावणे मस्ट आहे. काम करून घरी गेल्यावर घरच्यांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे. 

या दोन गोष्टी जर मी व्यवस्थित करत असेल तर बाकी मग मी काय करावं, 


हे मी ठरवणार.बाकीच्यांनी नाही. 

आता काहीजण म्हणतील की, प्रेमापोटी जवळचे लोक काहीतरी सांगतात,ते ऐकायचं नाही का ? 


तर मला सांगा,खूप जीवापाड प्रेम आहे पण म्हणून तुम्ही आजारी पडला अन दवाखान्यात ऍडमिट झाला तर जोडीदार फार तर फार तुमच्या उशा पायथ्याला बसेल. पण तुमच्या ऐवजी तुमचे सलाईन जोडीदार स्वतःला लावून घेईल का ?अन त्याने घ्यायच जरी ठरवलं तरी त्याचा इफेक्ट तुम्हाला मिळणार का ?नाही !


म्हणजेच तुमचं दुःख,तुमचा आजार व तुमचं सलाईन जर तुम्हालाच सोसायचं आहे 

*तर मग तुमचं सुख,तुमचा आनंद आणि तुमचं मुक्त जगणं हेही तुमचा अधिकार आहे.*

आलोय एकटा,जाणार एकटा 

हे जेव्हा उमजत तेव्हा मग सगळं सोपं होत जात. 

*प्रेम सर्वावर करा की.कुणी अडवलं आहे? पण आधी स्वतःवर तर प्रेम करू.तर चार दिवस जास्त जगू न?*


मन मारून शंभर वर्ष जगण्यापेक्षा मनासारखं जगताना सत्तर वर्ष मिळाली तरी ते जास्त (मला तरी) प्रिफर असेल. 

रडत खड्त,बेड रिडन अवस्थेत वयाची सेंचुरी करायला सांगितलंय कुणी?


त्यापेक्षा टकाटक अवस्थेत हसत हसत जगू अन हसत हसतच बाय बाय करून *"एक्झिट"* घेऊ की !

*मन मारणं हे एका लिमिट पर्यत एकवेळ ठीक आहे. पण सतत तेच करत राहिलो तर जगणार कधी?*

कारण मन मारणं म्हणजे काय ? *तर स्वतःच्या मनात जे आहे ते सोडून समोरचा म्हणतोय त्या अपेक्षेनुसार जगणं !*

मग त्यात समोरचा एकवेळ खुश होईलही पण तुम्ही कुढत जगणार ! मग त्याला काय अर्थ आहे?

बंड तर करावेच लागेल. 

त्याशिवाय देशाला सुद्धा स्वातंत्र्य मिळाले नाही 

ना हिंदवी स्वराज्य उभे राहिले !

*स्वातंत्र्याचा आनंद हवा असेल तर बंड हे करावेच लागेल.*

फक्त एकच की,मघाशी म्हटल्याप्रमाणे आपल्यावरील सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असू तर नक्की बाकी वेळेत काय करावं हे ठरवण्याचा अधिकार आपला आहे. त्या वेळेचा,त्या इच्छाचा मालक आपण स्वतः असलं पाहिजे. तरच आणि तरच जगणं सुंदर होईल. मी हे सांगतोय ते केवळ थियरी नाही तर तसे प्रॅक्टिकली मी जगतो. मनात आलं की सरळ ऑफिस बंद करून सिंहगडला दोन दिवस जाऊन राहतो. कामाचा कंटाळा आला तर सरळ ऑफिस कामाचे कोरल ड्रॉ बंद करून सरळ यु ट्यूब वर ऑस्कर विनिंग सिनेमे पाहतो. 

नेमका त्याचवेळी कस्टमर आला अन मी सिनेमा पाहत बसलोय हे पाहून वैतागला तर त्यालाही सांगतो, 

*"बैस आधी थोडं,दहा मिनिट सिनेमा पाहा.कामाचे नंतर पाहू. कारण माईंड फ्रेश असेल तरच काम क्रिएटिव्ह होणार न ?अन तुला जर क्रिएटिव्ह काम हवं आहे तर माझा मेंदू फ्रेश हवा.आणि कशामुळे मी फ्रेश होऊ शकतो हे मी ठरवणारं न ? तू कसा काय?"*


माझ्या या जगण्याच्या पध्दतिची आता कस्टमरला सुद्धा सवय झालीय. त्यामुळे तेही डिस्टर्ब करत नाहीत. त्यांचे काम त्यांना वेळेत व सुबक करून देण्यात मी जर कमी पडत नाही तर मग मी कस व केव्हा काय करायचं हे मी ठरवलं पाहिजे. 

हे माझं स्वानुभवी मत आहे. 

तर गड्याहो, जास्त व मस्त जगायचं असेल तर जगण्याचा *"पॅटर्न"* बदला. मन व तन मुक्त करा. जास्त फ्रेश वाटेल. आणि गंमत म्हणजे अमुक एक करणं चूक अन अमुक एक बरोबर हे ठरवलं कुणी? कारण आज जे चूक म्हंटल जात ते कालांतराने बरोबर असल्याचे सिद्ध झाल्याची 

पण उदाहरण आहेत की. 

शिवाजी महाराज जेव्हा प्रथम बंड करून उठले तेव्हा इथलेच जुने सरदार दरकदार त्यांना वेड्यात काढून *"हे असं करू नका"* म्हणत होतेच की.मात्र कालांतराने शिवराय म्हणत होते,जे काही करत होते तेच बरोबर असल्याचे सिद्ध झाले न ?

*तर म्हणून छान जगा !मस्त जगा !*


*सब से बडा एक हि रोग के क्या कहेंगे लोग !!*


❤️LOVE LIFE 💙

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks