आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in 12 जिवन जगण्याची मंत्रे... | 12 Life teaching Rules in audio mp3

12 जिवन जगण्याची मंत्रे... | 12 Life teaching Rules in audio mp3






१) कोणालाही न दुखवता जगणे

याच्या इतके अतिसुंदर कर्म

जगात दुसरे कोणतेच नाही

आणि......

ज्याला हे कळले  त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही.

२)  कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे .

विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते

शक्तीचे उगमस्थान आहे .

खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे .

वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.

स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.

...आणि अतिशय महत्वाचे "दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..

     

३) 'पश्चात्ताप' कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी' कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही....!

 म्हणूनच... वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे...!!

   

४ ) माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे.कुणी पाहत नाही. असा अर्थ काढु नये.जेव्हा नियती त्याचा हिशोब करते.तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही.

     

५) भावना कळायला मन लागतं,

वेदना कळायला जाणीव लागते,

देव कळायला श्रद्धा लागते,

माणूस कळायला माणुसकी लागते,

चांगलं जगायला सुंदर विचार लागतात,

आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी, समाधानी, निरामय आयुष्य लागतं


६)  माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा "दरवाज्याचा" जन्म झाला,

त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा "कुलूपाचा" जन्म झाला

आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही. तेव्हा मात्र "सीसीटीव्ही" चा ज न्म झाला.

  ७) जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,

हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,

अंतकरणात जिद्द आहे,

भावनांना फुलांचे गंध आहेत,

डोळ्यासमोर खुले आकाश आहे,

तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…

८ ) देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतात.

  🌴 कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते ...

आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात..

कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो ... पण टिकवून

 नाही ठेवू शकत ...

: आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल

तर तुम्ही नक्कीच खुप पुढे जाणार आहात....

कारण

"धनुष्याचा "बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो...


९)  संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे

जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल

तर स्वतःला खूप नशिबवान समजा

कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,

ज्यांच्यामध्ये क्षमता असते

 १०)  कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्या पर्यंत पोहचत असेल,तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केलेली असते.

  "आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.


काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..

काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..

काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..

आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी."


                 

११ ) माणुस मनापर्यंत पोहोचला ...

      तरच नातं निर्माण होतं ...

     नाहीतर ती फक्त ओळखच ठरते ... !!

     असे जगा की आपली "उपस्थिती" कुणाला जाणवली नाही तरी चालेल...

 पण आपल्या "अनुपस्थितीची" उणीव जाणवली पाहिजे..!!!

  

 १२) चांगले कर्म , चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं . पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

     एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते.जास्त वापरली तर झिजते.काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच....


👏👏👏👏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks