आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in ॠण | इयत्ता पाचवी मधील कविता run marathi kavita

ॠण | इयत्ता पाचवी मधील कविता run marathi kavita

 

www.FMmarathi.in

तुझ्या शेतात राबून 

माझी सरली हयात 

नको करू हेटाळणी 

आता उतार वयात ॥ १ ॥ 


नाही राजा ओढवत 

चार पाउले नांगर 

नको बोलूस बंगाळ 

नको म्हणूस डंगर ॥ २॥ 


माझ्या ऐन उमेदीत 

माझी गाईलीस ओवी 

नको चाबकासारखी 

आता फटकारू शिवी ॥ ३ ॥ 


माझा घालवाया शीण 

तेव्हा चारलास गूळ 

कधी घातलीस झूल 

कधी घातलीस माळ ॥ ४ ॥


अशा गोड आठवणी 

त्यांचे करीत रवंथ 

मला मरण येऊ दे 

तुझे कुशल चिंतीत ॥५॥ 


मेल्यावर तुझे ठायी 

पुन्हा एकदा रुजू दे

माझ्या कातड्याचे जोडे 

तुझ्या पायात बाजू दे ॥ ६॥

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)

www.FMmarathi.in
Thanks