आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in आपण आपलं मूल्य जाणतो का ? Apun aple mulye janto ka | free Marathi Audiobook mp3

आपण आपलं मूल्य जाणतो का ? Apun aple mulye janto ka | free Marathi Audiobook mp3

 
www.FMmarathi.in

आपण आपलं मूल्य जाणतो का?

आपलं मूल्य

एक व्यक्ती आत्महत्या करायला निघाला होता. ज्या नदीमधे तो आत्महत्या करायला निघाला होता, त्या नदीच्या किनाऱ्यावर एक वयस्कर गृहस्थ पायी फिरत होता.


तो नदीमध्ये उडी मारणार, त्याच वेळी त्या वयस्क गृहस्थाने त्याला अडवत विचारले, "अरे, तू हे काय करतो आहेस!!” ती व्यक्ती म्हणाली, "आता मला थांबवु नका, खूप झालं! या आयुष्यामध्ये काहीही राहीले नाही, सगळं व्यर्थ आहे! ज्याची इच्छा होती ते मिळालं नाही! जे नको होतं ते नशिबी आले. ईश्वर माझ्याविरुद्ध आहे. मग मी हे जीवन का स्वीकारू?"


तो वयस्कर गृहस्थ म्हणाला, "असं कर, एक दिवसासाठी थांबुन जा, उद्या मरण पत्कर. तू म्हणालास, की तुझ्या जीवनात काही नाही? तू म्हणतोस तुझ्याकडे काहीही नाही? मग एका दिवसाने असा काय फरक पडतो?"


तो म्हणाला, "काहीही नाही. समजा काही असतं, तर मग मी मरण्यासाठी कशाला आलो असतो?” तेव्हा ते वयस्कर गृहस्थ म्हणाले, "तू माझ्याबरोबर चल. माझा मित्र एक खूप मोठा डॉक्टर आहे. मी एकदा तुला त्याला भेटवू इच्छितो. एकदा त्याला भेटल्यानंतर तुझं आयुष्य बदलून जाईल. आजच्या ऐवजी तू उद्या मर. यामुळे तुझं काहीही बिघडणार नाही. तसंही तू म्हणाला आहेस की तुझ्या जीवनात काहीही नाही."


ती व्यक्ती, त्या वयस्कर गृहस्थाचे म्हणणं टाळू शकली नाही. तो त्यांच्या बरोबर त्या डॉक्टरांना भेटायला गेला. त्या वयस्कर गृहस्थाने आपल्या डॉक्टर मित्राच्या कानात काहीतरी सांगितले, तेव्हा डॉक्टर म्हणाले, “मी एक लाख रुपये देईन.” त्या व्यक्तीने इतकच ऐकलं, पण वृद्ध गृहस्थाने कानात काय सांगितलं, ते त्याला कळलं नाही.


तो वयस्कर गृहस्थ त्या माणसाकडे आला आणि त्याच्या कानामधे म्हणाला, "डॉक्टर तुझे दोन्ही डोळे एक लाख रुपयांमध्ये खरेदी करायला तयार आहेत. तू विकायला तयार आहेस का?"


तो ओरडला, "याचा अर्थ काय? मी डोळे विकून टाकू! एक लाख रुपयांमध्ये! दहा लाख दिले तरी मी ते विकणार नाही.” तो वृद्ध गृहस्थ डॉक्टरांकडे परत गेला. आणि परत येऊन म्हणाला, "बरं अकरा लाख देणार आहेत."


तो माणूस म्हणाला, "वेडा आहेस काय? मला हा सौदा करायचाच नाही. मी माझे डोळे कशाला विकू?" तो वयस्कर गृहस्थ म्हणाला, "तू तुझे कान विकणार आहेस का? तुझे नाक विकणार आहेस का? हे डॉक्टर कोणताही अवयव खरेदी करायला तयार आहेत. आणि जी किंमत मागशील, ती देण्यासाठी तयार आहेत."


तो म्हणाला, “नाही, नाही, अशा प्रकारचा कोणताही सौदा मला करायचाच नाही. मी का विकू?” तो वृद्ध गृहस्थ म्हणाला, "जरा बघ, तू तुझे डोळे 11 लाखामध्ये देखील विकायला तयार नाहीस आणि काल रात्री तू मरायला चालला होतास आणि म्हणत होतास की माझ्याकडे काहीही नाही. जर तुझं जीवनच व्यर्थ आहे, तर मग शरीराचे अवयव विकण्यासाठी काय हरकत आहे?"


हे ऐकल्यावर, तो माणूस निःशब्द झाला. त्याच्याजवळ उत्तरादाखल शब्द नव्हते. आज त्याने आपल्या जीवनाचे वास्तविक मूल्य जाणलं होतं.


काही शब्द अष्टवक्र महागीता भाग- एक मधूनः


जे मिळाले ते आम्हाला दिसत नाही. जरा या डोळ्यांचा विचार करा, हा एक चमत्कार आहे! डोळे हे कातडीचे बनले आहेत, कातडीचाच तो एक भाग आहे; परंतु डोळे पाहू शकतात, कसे पारदर्शी आहेत ते! असंभव ते संभव झाले आहे.


हे कान संगीत ऐकू शकतात, पक्ष्यांचा किलबिलाट, हवेचा घोंगावणारा आवाज, सागराचा खळखळाट! हे कान फक्त कातडी आणि हाडांनी बनलेले आहेत, हा चमत्कार तर बघा!


आपण आहोत, हाच एक मोठा चमत्कार आहे. यापेक्षा अजून काय मोठा चमत्कार असू शकतो ? या हाडा-मांसाच्या शरीरामध्ये चैतन्याचा दिवा प्रज्वलित आहे. जरा या चैतन्याच्या दिव्याचं मूल्य तर जाणा!


जितकी इच्छा करू, तितकं दुःख आपल्या जीवनामध्ये येईल. आपण जर पाहिलं तर न मागता कितीतरी जास्त आपल्याला मिळालं आहे! अभूतपूर्व अशी बरसात आपल्यावर झालेली आहे. काहीही कारण नसताना ! आपण काय कमावलं आहे? आपली कमाई काय होती, की ज्यामुळे आपल्याला हे जीवन मिळालं आहे?


यासाठी आपण काय केलंय? इथे सगळं आपल्याला भेट स्वरूपात मिळाल आहे! तरीही आपण चिंतित आहोत. तरीही आपण उदास आहोत.


                ♾

     

*”स्वीकार्यता ही क्रमिक विकासाची सूचक आहे. आपली तयारी किंवा आपला मनोभाव असा असला पाहिजे, की काहीही झाले तरी मी त्याला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. जेंव्हा आपण स्वीकारायला आणि प्रेम करायला शिकतो तेंव्हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलुची भरभराट व्हायला सुरवात होते.”*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks