आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in मोहम्मद रफी यांची संपूर्ण मराठी गाणी | All marathi song's off mohammad rafi

मोहम्मद रफी यांची संपूर्ण मराठी गाणी | All marathi song's off mohammad rafi


.
प्रभु तू दयाळू कृपावंत दाता 
दया मागतो रे तुझी मी अनंता

जगविण्यास देहा दिली एक रोटी 
नमस्कार माझे तुला कोटी कोटी 
वासना कशाची नसे अन्य चित्ता

तुझ्या पावलांशी लाभता निवारा 
निघे शीण सारा मिळे प्रेमधारा 
सर्व नष्ट होती मनांतील खंता

ज्ञान काय ठावे मला पामराला 
मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा 
तुझे नाम ओठी नको वेदगीता
________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks