आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in आम्ही अजूनही शिकतोय ... | Amhi ajunahi shiktoy | free marathi audiostory | marathi Audiobook mp3

आम्ही अजूनही शिकतोय ... | Amhi ajunahi shiktoy | free marathi audiostory | marathi Audiobook mp3


www.FMmarathi.in
आम्ही अजूनही शिकतोय !

दोन्हीची कॉकटेल बनवली तर आयुष्य सुखाचे होईल !!

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो;

नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो;

नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो;

नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.

आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली;

नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो;

मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.

आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला;

नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.

आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम;

नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌.

थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते;

तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !!

दोन्हीच कॉकटेल बनवल तर आयुष्य सुखाच होईल


सर्व मित्र मैत्रिणींना👍👍

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks