आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in 1000 + Free Marathi Audiobooks | Free audiostories | Fmmarathi.in Marathi Podcast Publisher

 बनारस हिंदू विश्वविद्यालय बांधताना जमिनीपासून निधी पर्यंत... 

हिंदू महासभेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक पंडित मदन मोहन मालवीय यांनी गोळा केलेली साधनसंपत्ती बघितली तर,

मनी मेकिंग मशीनचा अर्थ कळतो!

सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी, 

बनारस हिंदू विश्वविद्यालय उभे करण्यासाठी त्यांनी काही कोटीचा निधी अत्यंत प्रेमाने व कुशलतेने गोळा केला होता...


याच देणगीसाठी हैदराबादच्या निजामाला भेटले... 

विश्वविद्यालयाच्या नावातील 

"हिंदू" हा शब्द 

नबाबाला खटकत होता... 

पण निधीसाठी हिंदू या शब्दाशी तसूभरही तडजोड करायला 

पंडित मदन मोहन मालवीय तयार नव्हते.


समोर बसलेल्या पंडितजीं कडे आपल्या पायावर घेतलेला पाय हलवत नवाब बोलत होता... 

नबाबाच्या पायात मोजडी होती... 

एका अर्थी अप्रत्यक्षपणे नवाब 

पंडितजीना वहाण दाखवत होता.


पंडित जागेवरून उठले आणि 

अत्यंत नम्रतेने त्यांनी नबाबाच्या पायातली मोजडी काढून घेतली... 

नबाबाने दुसरा पाय पुढे केला 

पंडितजीनी ती ही मोजडी काढून घेतली आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयासाठी आपल्याकडून हीच देणगी असे मी समजतो म्हणून बाहेर पडले...


आपण पंडित जी ना जोडे दिले 

या आनंदात, नवाब खुशीत गाजरं खात होता...

आणि तो पर्यंत नबाबाच्या कानावर बातमी येऊन धडकली.


पंडित जी त्याच्या मोजड्यांचा हैदराबादच्या भर चौकात लिलाव करणार आहेत... 

नबाबाच्या अब्रूचं खोबरं व्हायची वेळ आली होती...


आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी पंडितजी... नवाबाच्या मोजड्या घेऊन लिलावासाठी हैदराबादच्या भर चौकात उभे राहिले... 

लिलावाची बोली सुरू झाली... 

नबाबाचा खास माणूस प्रत्येक बोलीच्या वर आपली बोली लावू लागला... 

पंडितजीचे जिवलग सहकारी गर्दीतून नबाबाच्या खास माणसाच्या बोली च्या वर प्रत्येक वेळी बोली लावत होते... 

अर्थात तशी योजना खुद्द पंडितजीनीच केली होती...


पंडितजीची अपेक्षा होती तेवढी बोली नबाबाच्या खास माणसाने लावली... 

बहुदा ती तीन-साडेतीन लाखाच्या आसपास असावी... 

पंडितजींनी आपल्या जिवलग सहकाऱ्यांना डोळ्याने इशारा केला..

बोली थांबली... 

लिलाव संपला...

आपल्याच मोजड्या... 

तीन साडेतीन लाख रुपये मोजून नवाबाने हैदराबादच्या भर चौकातून खरेदी केल्या... 

आणि हो हे शे-सव्वाशे वर्षापूर्वीचे 

तीन साडे तीन लाख रुपये... 

जेव्हा ६४ पैशांचा रुपया होता 

आणि एका रुपयाला ३२ नारळ मिळत होता.


"#हिंदू" या एका शब्दासाठी आपल्या बुद्धीमत्तेचे सगळे कसब पणाला लावणारा... 

नबाबा ची सगळी गुर्मी मस्ती उतरवून त्याच्याच मोजड्या त्याच्याच गळ्यात मारणारा... 

भारत मातेचा थोर सुपुत्र...


देशाच्या स्वातंत्र्यासाठी तनमनधन करणारा हा आधुनिक महर्षी...

स्वातंत्र्यापूर्वी अवघे दहा महिने आधी स्वर्गवासी व्हावा हा काय दैवदुर्विलास...


पुण्यतिथीनिमित्त


पंडितजींच्या चरणी शतकोटी वंदन!

🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks