आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in देव पाहला पाहला... | Dev pahila pahila | Marathi Audio Poem | अजय रमेश चव्हाण

देव पाहला पाहला... | Dev pahila pahila | Marathi Audio Poem | अजय रमेश चव्हाण

देव पाहला पाहला

देव पावला पावला ।

माझ्या हाकेला सतत

देव धावला धावला ।।


दुःख खुरपत नेतो

विळा घेऊनिया हाती ।

नष्ट दारिद्र्य करण्या

नित्य उठतो प्रभाती ।।


केले लहानाचे मोठे

माझ्या जागत्या देवाने ।

जन्मां आलो म्हणूनिया

जग पाहतो सुखाने ।।


तीर्थ अन्य नाही कुठे

घरामध्ये साक्षात्कार ।

माझ्या देवाच्या हाताने

घडतात चमत्कार ।।


झोपडीत सुख आहे

खरे देव असताना ।

काय मिळणार देव

दगडात पाहताना? ।।


बाप विठ्ठल माणतो

आई खरी रखुमाई ।

देव घरी असताना

कुठे शोधणे विठाई? ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळीता.दारव्हा, जि.यवतमाळमो.८८०५८३६२०७

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)

www.FMmarathi.in
Thanks