आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in जुलूमशाहीचा होता एक काळ... छत्रपती संभाजी महाराजांना समर्पित कवी अनंत राऊत यांची कविता | Poem on Chatrapati Sambhaji Maharaj by Anant Raut

जुलूमशाहीचा होता एक काळ... छत्रपती संभाजी महाराजांना समर्पित कवी अनंत राऊत यांची कविता | Poem on Chatrapati Sambhaji Maharaj by Anant Raut

 जुलूमशाहीचा होता एक 'काळ' रयतेचा छळ । माजलेला


तोडण्यां ती नाळ अन्यायाची माळ 

जन्मा आला बाळ | शंभूराजा


मुघलांची सत्ता माणसांची मंदी वासनेची धुंदी । चढलेली


वाचविल्या माता गुलामासबंदी नारीला जो वंदी । शंभूराजा


संस्कृतचा ग्रंथ बुधभूषणम लागतो जनम । समजाया


तो नाईकाभेद तो नखशिखांत केला पादाक्रांत । ज्ञानमार्ग


कापलेली मांन झुकलीच नाही चालेनाच काही । औरंग्यान्चे


रयतेच्यासाठी रक्तात नाहला अजिंक्य जाहला । शंभुराजा


जळता जळता संपले जीवन आयुष्याचे रान । शंभूराजा


स्वराज्यासाठीच तन-मन-धन

खरे बलिदान । शंभूराजा


मावळ्यांनो आज बाप हा जाणवा आदर्श मानावा । शंभूराजा



काळजात ठेवा धगधगता दिग शिवबांचा छावा । शंभूराजा


डोंगरदरीत कडा कपारीत

आजही इथल्या पवित्र मातीत माणूस जातीत

हर एक जळत्या दिव्याच्या वातीत 

मर्दाच्या छातीत । शंभूराजा


कवी - अनंत राऊत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks