आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in माणसाच्या सुखाच्या कल्पना.... Mansachya sukhachya kalpna

माणसाच्या सुखाच्या कल्पना.... Mansachya sukhachya kalpna


माणसाच्या सुखाच्या कल्पना आता साधनांशी जोडलेल्या आहेत. बंगला, गाडी, गाद्या, लोड अशा ऐशआरामाच्या साधनांसाठी माणूस धडपडतो आहे. विशेषत: आजच्या चंगळवादाच्या काळात तर यालाच जास्त महत्त्व आले आहेे. सगळे लोक मिळेल तो शॉर्टकट घेत ही सर्व सुखाची साधने कशी मिळतील, याच्या मागे धावताना दिसत आहेत. मात्र,हे गाद्या, लोड, उशा असली सुखसाधने काही शेवटपर्यंत साथ देणारी नाहीत. म्हातारपणी सुखाची साधने असतील, पण त्यांचा उपभोग घेण्याइतकी ताकद शरीरामध्ये नसेल. अनेक लोकांची सुखाची आयुष्याची कल्पनाच साधनांशी जोडलेली असते. एक स्वत:चे सर्व सोयींनी युक्त घर असावे, घरासमोर अद्ययावत गाडी उभी असावी. घरात टीव्ही, फ्रीज अशी सगळी साधने असावीत, असे प्रत्येकाला वाटत असते. ही साधने मिळविण्यासाठी आयुष्यभर जिवाचा आटापिटा चालू असतो. अधिकाधिक पैसे कमावण्याची धावपळ त्यासाठीच चालू असते. घरातील महिला, अन्य सर्व सदस्य काही ना काही काम करून पैसे कमावून ही सगळी साधने उभी करण्याचा आटापिटा करत असतात. या सगळ्या घाईत खरे सुख काय असते? खरे जीवन कसे जगायचे? समाधान खरे कशात मिळेल? याचा विचार बाजूला पडतो. ही सगळी सुखे मिळविल्यानंतर लक्षात येते की, समाधान आणि सुख या साधनांमध्ये नाहीच! तेव्हा मग फसवणूक झाल्याचे लक्षात येते.  शेतात पिके असताना पाखरे येऊन पिके खातात, तसे जोवर तुझ्याकडे समृद्धी आहे तोपर्यंत रक्ताचे नाते असलेले अनेक लोक येतील आणि तुला खाऊन फस्त करतील. या मोहमायेच्या जगात, मायापाशात माणूस जर अडकला, तर तो कधी संपून जाईल, ते सांगता येत नाही. जेव्हा हे कळते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते.


😊

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks