आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे आयुष्य.! Thoughts about life 💭

इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे आयुष्य.! Thoughts about life 💭

!!इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे आयुष्य.!!

        चांगला स्वभाव हीच माणसाने कमावलेली स्वतःची सर्वात मोठी संपत्ती असते.कोणाचा सरळ स्वभाव ही त्याची कमजोरी समजू नका तर ते त्याचे संस्कार असतात. ज्याच्या जवळ शक्ती बरोबर सहनशक्ती सुद्धा असते अशा व्यक्तीच्या शक्तीचा कधीही मुकाबला होऊ शकत नाही.

चांगला माणूस कधीही मतलबी नसतो, तो फक्त अशा लोकांपासून दूर रहात असतो. ज्यांना त्याची कदर नसते. अशा चांगल्या, माणसांची निंदा तेच लोक करत असतात जे त्याची बरोबरी करू शकत नाहीत.आयुष्यात निरंतर चांगले बनून रहा. कोणी तुमचा सन्मान करेल तर कोणी तुमचा अपमान करेल, कारण ज्या लोकांजवळ साधी राहाणी, उच्च विचारसरणी, धैर्य आणि दया हे गुण असतात ते लोक खूप भाग्यशाली असतात.

       चांगलं व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं ही आईवडीलां कडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते. मात्र एक चांगलं व्यक्तीमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते. फक्त माणूस होणं पुरेसं नसतं.माणसात माणूसकी असणं हे देखील आवश्यक असतं.

         व्यक्तीची किंमत तेव्हाच असते जेव्हा त्याची आवश्यकता असते. नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील तिजोरीत ठेवून दिले जातात. म्हणून कधीही हा अभिमान नको की मला कोणाची गरज नाही आणि हा देखील अभिमान नको की माझी गरज सर्वांना आहे.लक्षात ठेवा अहंकार कधीच सत्य स्वीकारीत नाही. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला न स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार समजतात.

       जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सार्थ होणं असं नाही तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सार्थक होणं होय. तुम्हाला जी व्यक्ती बनायची आहे त्यासाठी जर तुम्ही मेहनत घेत नसाल तर तुम्ही अशी व्यक्ती बनाल जी बनायची तुमची इच्छा नाहीये. फक्त काबाडकष्ट करणारा प्रत्येक माणूस यशस्वी होईलच असे नाही परंतु कष्टा बरोबर कामाचे योग्य नियोजन करणारा माणूस नक्की यशस्वी होतो.

न थांबता, न थकता केलेला प्रवास म्हणजे आयुष्य. येणाऱ्या प्रत्येक अडचणी वर मात करुन समोर जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे. या जगात कुणीच कुणाचं नसतं, आपलं आयुष्य हे आपणच जगायचं असतं. आयुष्याला प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगून बघा, जीवनाचा खरा आनंद अनुभवायला मिळेल आणि जीवनाचेही सार्थक होईल.

आयुष्य...हि एक अशी Train आहे..जी जन्मापासून, मृत्यु पर्यंत सुख दुःखाच्या. वेगवेगळ्या फलाटावर थांबते. आणि आपल्याला. अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते.

  आपल्या सर्वांचं आयुष्य एका रस्त्यासारखं आहे. कुठे खड्डे असतात, कुठे चढ असतो, तर कुठे उतार असतो. पण रस्ता हा निरंतर तुमच्या समोरच असतो मग खड्डे बघून घाबरून थांबायचं का त्याच रस्त्याने आपण ठरवलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा हे सर्व आपल्या हातातच असत. "लोक बदलले की आपण आपला रस्ता बदलायचा, रस्ता बदलला की आयुष्य बदलते पण चुकीच्या व्यक्ति मागे पळण्यात रस्ता चुकला, की नशीब बिघडते.

एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात कधीही नवीन सुरूवात करायला घाबरू नका. त्यासाठी मुहूर्त नाही तर जिद्द महत्त्वाची असते

तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.कोणत्याही माणसाला तो अडचणीत असताना जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. आयुष्यात संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आयुष्यात कोणाला इतकंही महत्त्व देऊ नका की स्वतःचं महत्त्व कमी होईल.जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. तरच आयुष्याशी सामना करता येईल.आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks