...तो स्वतः engineer .15 वर्ष नोकरी केली आणि नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला .भाडयाने जागा घेतली .धंदयात जम बसला .स्वतःचा गाळा घेतला .त्याच्या जवळ हिम्मत होती, knowledge होते ,सर्वांशी जमवून घेण्याची कला होती,
थोड्यात दिवसात त्याने स्वतः ची फॅक्टरी घेतली .
अच्यानक एक संधी आली .एक मोठी export ऑर्डर आली .
पण त्यासाठी मोठी जागा आणि finance पण लागणार होते .
त्याच वेळेस त्याच्या जवळची थोडी मोठी फॅक्टरी विकायला निघाली होती .त्याचा मालकाचे निधन झाल्यामुळे त्याच्या विधवा बायकोने फॅक्टरी विकायला काढली होती .
त्याने खूप विचार केला .बँक मॅनेजरशी बोलला आणि ती फॅक्टरी विकत घेण्याचे ठरविले .
त्या विधवा बाई बरोबर एक दोन मीटिंग झाल्या .एक दोन मीटिंग जवळच्या हॉटेल मध्ये झाल्या .
कोणी तरी ते बघितले ,त्याच्या बायकोला सांगितले तुझ्या नवऱ्याचे लफडे आहे .घरी धुसपूस सुरु झाली पण नंतरच्या मीटिंग मध्ये तो बायकोलाच घेऊन गेला .सर्व ठीक झाले जीवनातले काळे ढग निघून गेले.
सर्व सुरळीत सुरु असताना दिवस फिरले .त्याने एक्स्पोर्ट केलेले प्रॉडक्ट sample fail झाले .order cancelled व्हायची वेळ आली .
त्याचा 50 टक्के धंदा एका कंपनी बरोबर होता .त्याचा purchase मॅनेजर बदलला .नवीन मॅनेजर ने आपला suplier आणला .ह्याची ऑर्डर कमी कमी करत बंद केली .
दुसऱ्या एक कंपनीने आपले डिपार्टमेंट अहमदाबाद ला शिफ्ट केले .ते म्हणाले आम्ही तिथे सप्लायर develop करतो .ह्याची ऑर्डर कमी झाली .
संकट आली कि एकदम येतात असा नियमच आहे .
बँकां इंटरेस्ट भर म्हणून मागे लागल्या amount खूप होती .
तो खूप त्रासला .डोक्यात नको नको ते विचार येऊ लागले .
अगदी जीव देण्या पर्यंत .
एक दिवस त्याने गाडी काढली .दारूची बाटली घेतली. लोणवल्याला हॉटेल बुक केले .
सर्व विसरायला दारू पिऊ लागला .पण ती चढेना .तो प्रॉब्लेम विसरू शकत नव्हता .शेवटचा पेग भरला ,हॉटेलच्या गॅलरीत येऊन बसला .पावसाळ्याचे दिवस होते .वातावरण खूप छान होते .आजूबाजूला खूप झाडे होती .
त्याचे लक्ष्य जवळच असलेल्या झाडाकडे गेले .एक चिमणी तिथे घरटे बांधत होती .जवळजवळ पूर्ण झाले होते .कधी चोचीत काडी आणायची तर कधी एखादे पीस .जणू पिल्लांसाठी गादि बनवत होती
त्याचे पिणे चालू होते .इतक्यात वातावरण बदलले .वारा सुरु झाला .वाऱ्याचा जोर वाढला पाऊस हि सुरु झाला .वादळच सुरु झाले बघता बघता चिमणीच्या घरट्याच्या काड्या उडू लागल्या पिसेही उडाली .सोसाट्याच्या वाऱ्यात चिमणीचे घरटे उडाले .
त्याचा आधीच मूड खराब होता .हे बघून तो अधिकच नर्व्हस झाला .
झोपायला गेला झोप त येत नव्हती .परत वाईट विचार सुरु झाले .मधेच आत्महत्याचा हि विचार येत होता .
सकाळी उशिराच उठला .काही सुचत नव्हते परत बाटली आणावी सर्व विसरून जाई पर्यंत पीत बसावे .
त्याने ब्रेकफास्ट मागवला .गॅलरीत येऊन बसला .पाऊस थांबला होता .वातावरण प्रसन्न होते
आणि बघतो तर काय त्याला ती चिमणी परत दिसली .चोचीत काडी होती तिने सकाळपासून घरटे बांधायला सुरुवात केली होती
फक्त फांदीची जागा बदलली होती कालच्या वादळातून शिकली होती .जरा आडोश्याची वारा कमी लागेल अशी जागा शोधली होती .
त्याला स्वतः engneer असल्याची लाज वाटली
त्याने विचार बदलला गाडी काढली मुंबई गाठली fail झालेले design परत बघतिले त्याचा मुलगा इंजिनीरिंग करत होता फायनल इयर .त्याच्या मित्राना बोलावले .त्याच्या प्रोफेसरना भेटला आणि सर्वांना नवीन design बनवायला सांगितले. प्रोफेसरांनी खूप मदत झाली .
नवीन design चे प्रॉडक्ट कस्टमर ला परत पाठवले ते पास झाले ऑर्डर मिळाली advanced मिळाला .
इकडच्या ज्या purchase maneger ने ह्याच्या ऑर्डर cancelled केल्या होत्या त्याचाही फोन आला .त्याच्या supplier ला quality maintain करता आली नाही म्हणून ह्याला ऑर्डर परत मिळाल्या .हळूहळू सर्व सुरळीत सुरु झाले
एक दिवस तो परत लोणावळ्याला निघाला पण ह्यावेळेस त्याच्या बरोबर बाटली नव्हती तर बरोबर मुलगा आणि बायको होती .
बायको ...कुठे जातोय ?
तो ..... जिथे माझ्या आयुष्याला परत कलाटणी मिळाली तिथे
त्याच्या डोक्यात एकच विचार होता ...
हॉटेल तर तिथे असेल पण आयुष्याला कलाटणी देणारी चिमणी तिथे असेल का ?
0 टिप्पण्या