आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in जिंदगी जिंदाबाद... Zindagi Zindabad | Marathi Free Audiobook

जिंदगी जिंदाबाद... Zindagi Zindabad | Marathi Free Audiobook

 आयुष्यभर मनाला वाटेल तसं जीवन जगत आलो, जो छंद आवडला तो अगदी मनापासून जोपासला, मग हातात काय आहे ? पायाखाली काय आहे ? मला जमेल का ?  हे कधीच पाहिलं नाही.... आता फक्त हे सगळं शेवटपर्यंत हे जपत राहायचं, कारण हा पसारा एवढ्या सहजासहजी सुटणार असं वाटत नाही.... पण एक मात्र नक्की झालं, आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप झाला नाही, कारण जे केलं ते अगदी मनापासूनच केलं.... स्वतःच्या आयुष्याचे लाड पुरवताना बराच वेळा खाचखळगे आले, असे काही क्षण आले की त्या ठिकाणी निर्णय चुकल्यासारखेही वाटलं, पण त्यातून मार्ग काढत, मी घेतलेला निर्णय योग्यच आहे, हे सिद्ध करून दाखवल्यानंतर स्वतःच्या पाठीवर स्वतःच थाप मारून घ्यावी असेही वाटलं....आयुष्य हे असंच असतं, बराच वेळा आपण जे ठरवतो ती होईलच असं नाही कदाचित त्यापेक्षाही उत्तम आणि सुंदर आपल्या पदरी पडतं, आपल्याला मिळतं, मग काय हवं अजुन या क्षणभंगुर आयुष्यात ?

#जिंदाबाद #जिंदगी

#आत्मविश्वास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks