आज morning walk ला देशपांडे काका, जोशी काका ,कुलकर्णी काका , भेटले.••• तिघे बऱ्याच दिवसांनी भेटले, म्हणून बगीच्यात बसून गप्पा मारत बसले .••••
देशपांडे काकांनी विचारले कशी चाललीय मग दिवाळी ची तयारी ??? गम्मत म्हणजे तिघांची मुल परदेशी आहेत.••• कोणाची अमेरिकेत ,तर कोणाची जर्मनी ला .••• त्यामुळे प्रत्त्येक घरी आजी आजोबाच आहेत .•••
कुलकर्णी आजोबा म्हणाले , •••
!! अहो कसली आलीय दिवाळी अन् दसरा ??? मुलं येथे नाही , म्हणून उत्साहच वाटत नाही बघा•••. दोघेच दोघे घरात काय करणार ??? अन् काय खाणार ???
जोशी आजोबा थोडे अबोलच आहेत ,म्हणून फक्त हसले .••••
देशपांडे आजोबा म्हणजे ••• full of life ,एक आनंदी व्यक्तिमत्त्व , एकदम मस्त , हौशी ,सर्वांशी दोस्ती त्यांची . अगदी लहान मुलांपासून ते त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असणारे सर्व त्यांचे मित्र.••••
ते म्हणाले,•••• अहो !! असा काय विचार करताय ??? आपली मुलं खूप शिकावी.•• पूढे शिक्षणासाठी अमेरिकेत जावी •••.त्यांची खूप प्रगती व्हावी •••.अशी आपलीच स्वप्न होती ना. ••आयुष्यभर त्याच एका उद्देशाने आपण काम करत होतो ना••• .मग आता आपली स्वप्नं पूर्ण झाली आहेत.••• मुलं आपापल्या मार्गाला लागली आहेत ••.आता ती आपल्यावर अवलंबून नाही.••• ही किती आनंदाची गोष्ट आहे •• .अहो!! जेंव्हा मुलं शिक्षणात छान करत होती , 'scholarship' वर अमेरिकेत गेली तो आनंद आपणच enjoy केला. ••••आपल्या नातलगांमधे त्यामुळे आपल्याला विशेष दर्जाही मिळाला ••• .मुलांच्या या सर्व गोष्टींमुळे आपण आनंदाने फुगत होतो त्यावेळी. •••. स्वतः ला नशीबवान समजत होतो. •• कधी कधी 'ग ' ची बाधा पण होत होतीच.•••
अगदी ताठ मानेने ,कॉलर वर करून अभिमानाने रहात होतो ना.••• आकाश ठेंगणे झाले होते त्यावेळेस.•••मग अजून काय पाहिजे ??? किती दिवस मुल आपल्या जवळ राहणार?? कधी तरी दूर जाणारच ते.•••.घेऊ दे त्यांना उंच भरारी . आपल्याला त्यात आनंदच आहे •••. शेवटी प्रत्त्येक आई वडीलांची हीच इच्छा असते.••••
आता आपण येथे , आणि मुलं तिथे .हे त्याच स्वप्नांचे/ आनंदाचे 'side effects' आहेत. तेंव्हा हे पण त्याच spirit ने घ्यायला पाहिजेत.••••
मग आता तक्रार नसावी ••. मुलं येथे सणावारी ,आपल्या छोट्या मोठ्या अडचणी च्या वेळेस येथे नसतात तर नाराजगी नसावी••••. चेहऱ्यावर वर बिचारेपणाचा भाव नसावा.••• आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सौ. ना अजिबात रडू द्यायचे नाही आपण. ••••
अहो !! मुलांचा तेथून फोन आला की त्यांचा प्रश्न काहीही असो •••••आमचे उत्तर ठरलेल असत. "आम्ही अगदी उत्तम आहोत. मजेत आहोत. आनंदात आहोत. We are perfectly fine. and enjoying life ." आम्ही त्यांना आमच्या जबाबदारीतुन मुक्त केलंय. त्यांना काय कमी काम असतात ??lawn maintenance ते laundry. सर्व कामे नोकरी बरोबर करावी लागतात .•••• अजूनही ते आपली जबाबदारी आहेतच .ते तिथे आनंदी रहायला आपण येथे मजेत राहणे आवश्यक आहे .••••
आता आम्ही त्यांना सल्ले देणे बंद केले••. आपले problem पण सांगतच नाही.••• "let them live their life .let them enjoy."
मी खरं सांगू का ••• जोशी साहेब अहो!!
मी तर भारतातच राहुन नोकरी केली .•••पण माझ्या आई वडिलांच्या गरजेच्या प्रत्त्येक वेळेस मी त्यांच्या जवळ होतोच असं नाही झालं ••••.हे चक्र असंच चालू राहणार ••••. परिस्थिती आनंदाने accept करावी .•••
अहो !! आता माझे दुसरे बरेच नवीन नातेवाईक आहेत .••आम्ही त्यांना आमचे. Indian नातेवाईक म्हणतो .••आमच्या शेजारचे मुलं , मुली हे सर्व आमचे नातेवाईकच आहेत . ••त्यांच्यात आम्ही आमच्या मुलांना ,नातवंडांना बघतो ••.खूप मजेत आहोत आम्ही या मंडळी बरोबर. ••अजिबात एकटेपणा जाणवत नाही.•• देशपांडे आजोबा पूढे मिश्किलपणे म्हणाले••• अहो!! त्या अमेरिकेन नातेवाईकांपेक्षा हे Indian नातेवाईक रोज दिसतात . आधार आहेत आमचे . ही सर्व मंडळी माझ्या करिता खूप खास आहेत .••••
कूलकर्णी साहेब, आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर काही न काही नवीन होणारच. म्हणून आनंदी रहाणं सोडायचं का ?? दिवाळी साजरी का करायची नाही ??? सांगा बरं .••••
अहो !! फराळ अमेरिकेत पोहचला ना ,मग झालं .मुलांचे फोन येतात ना . मग अजून काय पाहिजे ? आणि समजा नाही आला फोन म्हणजे असं समजायचं
" No news means good news "
They are fine. ते रमले आहेत आपल्या संसारात ,मुलाबाळांमधे . All is well अस समजायचे .••••
तिथे पण आणि येथे पण .•••
आपण स्वस्थ व मस्त रहायचे •••
कुलकर्णी व जोशी आजोबा एकदम charged झाले .•••• पटल त्यांना .•••
घरी आले ते उत्साहातच.काल पर्यंत सर्व गोष्टींना नाही नाही म्हणणारे ••• . कशाला ??? राहु दे ना. म्हणणारे , आजोबा आजींना म्हणाले,•• "चला लागू या दिवाळी च्या तयारीला ". लगेच शेजारच्या गायत्री ला फराळाचा अॉर्डर दिला . अग !! on line दिवाळी पहाट केंव्हा आहे ??•••आजोबांनी विचारले ??? •••
आजी आश्चर्य चकित तर झाल्याचं . पण कुठेतरी आजोबांमधे झालेला बदल बघून त्यांना आनंदही झाला .••••
म्हणतात ना •••••
" कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तिंपेक्षा , प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी , जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल."••••
- संध्या बेडेकर.
😊
0 टिप्पण्या